K2S Night Trek: कात्रज 2 सिंहगड ट्रेक.....एक अनुभूती....आणि एक अविस्मरणीय अनुभव...
Trek Date: 22-10-2016
K2S: कात्रज 2 सिंहगड ट्रेक.....एक अनुभूती....आणि एक अविस्मरणीय अनुभव...
16 members...16 hills...9 hrs of thrilling journey.....and excitement.
----------------------------------------------------------------------------------------
K2S करायचा विचार केला आणि सर्वानी करायचं ठरवले. जेवढे मेंबर्स येतील त्यांना घेऊन करायचं.आमच्या ग्रुप मधील केतन पवार ह्या ध्येयवेडयाने ह्या अगोदर 3 वेळा हा ट्रेक केला होता म्हणून तोच लीड करणार असे ठरले. आणि यशस्वीपणे केतनने सर्वांना बरोबर घेऊन हा ट्रेक पूर्ण केला. Thank YoU केतन.
दिवस ठरला 22 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजता निघायचं आणि रात्रभर चालून सकाळी 7 वाजेपर्यंत पोचायचं. त्याप्रमाणे रात्री 8 वाजता निघालो आणि 9 वाजता कात्रज tunnel च्या इथे पोचलो. 9.30 ला वाघजाई माता मंदिरात देवीचा दर्शन आणि शिवाजी महाराजांचा नाव घेऊन हर हर महादेव...जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन ट्रेक ला सुरुवात केली. एक एक डोंगर चढून..उतरून आम्ही पुढे चालत होतो. कधी मोठी पायवाट..कधी छोटी पायवाट...कधी वाटच नसेल तर ती शोधत..छोटी..मोठी वाढलेले गवत..असा गवतातून आम्ही सर्वजण 18 मेंबर्स एकामागोमाग एक असे पुढे जात होतो. सर्वात पुढे केतन आणि त्याच्या मागे आम्ही सर्वजण एकमेकांना साथ देत...हाथ देत पुढे चालत होतो. 2 डोंगर चढून गेल्यानंतर आम्ही सर्वानी थोडंसं थोडंसं खाऊन घेतलं आणि मग त्याच उर्जेवर पुढे चालू लागलो. डोंगर उतरून पुन्हा चढून जावं लागत होतं. पण एकदा का डोंगर चढला कि वर सुटलेल्या वाऱ्यावर मन प्रसन्न होऊन जायचं आणि पुढे जाण्यासाठी त्याचा खूप मोठा आधार मिळायचा. डोंगर चढून वर गेलं कि दूर कुठे तरी सिंहगड वरचा आकाशवाणीचा लाल दिवा आम्हाला खुणावयाचा आणि त्या दिशेने आम्ही मार्गस्था व्हायचो. असेच एक एक डोंगर उतरून..पुन्हा चढून आम्ही एक एक पावलं..एकमेकांच्या साथीने आमचा लीडर आम्हाला पुढे नेत होता.
रात्रीचा 1.30 वाजला आणि जेऊन घ्यावं आणि मग थोडी विश्रांती घेऊन पुढे निघावा असं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे डोंगर उतारावरच आम्ही जेवण केलं. थोडं-थोडं खाण्याचा सल्ला आम्ही सर्वांना देत होतो. काहींनी तो पळाला आणि काहींनी.......असो. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही सर्वजण पुढच्या वाटेला लागलो. पुन्हा पुन्हा डोंगर चढून-उतरून आम्ही जात होतो. आम्ही किती खाली उतरतोय आणि किती वर चढतोय हेच रात्रीच्या काळोखात आम्हाला कळत नव्हते आणि तेच आमच्या दृष्टीने महत्वाचे होते. सर्वांना थकवा आला होता पण उत्साह कोणाचा कमी नव्हता झाला. कोणी ग्लुकॉन-D ...तर कोणी ग्लुकॉन-D चं पाणी पिऊन पुढे जात होते. कोणत्याही परिस्थितीत ट्रेक पूर्ण करायचा हे एकाच उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं. आता आम्ही शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटचे 2 तास उरले होते आणि हेच खूप आमचा अंत पाहणारे ठरले. पण अंततः ते पूर्ण करून आम्ही कोंढणपूर-सिंहगड रोड ला पोचलो आणि सर्वानी एकाच जल्लोष केलं पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजी...शिवाजी महाराज कि जय अशा घोषणांनी आम्ही फ्रेश झालो. आता रोड ने चालत आम्ही सर्वजण पुढे चालत राहिलो आणि शेवटी सिहगडावर सकाळी 6 वाजता पोचलो. ठरल्याप्रमाणे आम्ही वेळेच्या अगोदरच आम्ही आमचं ध्येय गाठलं.
ध्येयवेडे टीम ने बरेच ट्रेक केले पण ते बहुदा सर्व दिवसा केलेले. पण हा ट्रेक रात्रीचा आणि तो हि 9 तासांचा. लांबलचक...आणि बऱ्याच जणांना कधी एकदा संपतोय असा शेवटी शेवटी वाटणारा...पण एकदा तरी करावा असा ट्रेक. थरारक..साहसी.आणखी किती विशेषण लावावीत... ह्या अगोदर कधीहि एवढा मोठा ट्रेक मी तरी केला नव्हता. काहींचा तर हा पहिलाच ट्रेक. त्यांनी सुद्धा पूर्ण केलं त्यांचा विशेष कौतुक आणि अभिनंदन.
सर्वांना थँक्स आणि सर्वांचं अभिनंदन. Dr निलेश कुलकर्णी आणि संजय पाटील ह्या दोघांचं विशेष थँक्स.....and two dashing ladies शर्वरी पाटील आणि शीतल पुजारी ह्या दोघींचं विशेष कौतुक...आणि हॅट्स ऑफ....they inspired all of us....
केतन....special thanks to u...from all members...
YouTube Video
















Comments
Post a Comment