गोरखगड – एक अद्भुत, अविस्मरणीय आणि थरारक ट्रेक गोरखगडाच्या उंचीवरून सह्याद्री दिसतो विराट, प्रत्येक कडा, प्रत्येक शिखर सांगते पराक्रमाची बात... निवांत क्षणी मनाला लाभे शांततेचा अनोखा स्पर्श, निसर्गाच्या या मंदिरात हरवून जातो अहंकार, दुःख आणि हर्ष... गर्दीच्या जगातून दूर, स्वतःलाच इथे भेटतो, सह्याद्रीच्या कुशीत विसावून आत्मा नव्याने बहरतो... गोरखगडाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे जे विराट रूप डोळ्यांसमोर उभे राहते, ते पाहून मन अक्षरशः भारावून जाते. त्या क्षणी मनात उमटलेल्या भावना अशा काहीशा शब्दांत व्यक्त होतात. गडाविषयी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात वसलेला गोरखगड समुद्रसपाटीपासून सुमारे २१३७ फूट उंच आहे. पुण्यापासून अंदाजे १७० किमी अंतरावर असलेला हा गड देहरी या गावातून सुरू होतो. देहरी हे गाव मुरबाडपासून २५ किमी तर कर्जतपासून ५० किमी अंतरावर आहे. गोरखनाथ आश्रमाजवळून या ट्रेकची सुरुवात होते. मध्यम ते कठीण आणि काही ठिकाणी धोकादायक स्वरूपाचा हा ट्रेक प्रत्येक ट्रेकरच्या Bucket List मध्ये असायलाच हवा. सुरुवातीची वाट तुलनेने सोपी असली तरी पुढे ती अधिक...
Posts
Showing posts from June, 2026