Posts

    गोरखगड – एक अद्भुत, अविस्मरणीय आणि थरारक ट्रेक गोरखगडाच्या उंचीवरून सह्याद्री दिसतो विराट, प्रत्येक कडा, प्रत्येक शिखर सांगते पराक्रमाची बात... निवांत क्षणी मनाला लाभे शांततेचा अनोखा स्पर्श, निसर्गाच्या या मंदिरात हरवून जातो अहंकार, दुःख आणि हर्ष... गर्दीच्या जगातून दूर, स्वतःलाच इथे भेटतो, सह्याद्रीच्या कुशीत विसावून आत्मा नव्याने बहरतो... गोरखगडाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे जे विराट रूप डोळ्यांसमोर उभे राहते, ते पाहून मन अक्षरशः भारावून जाते. त्या क्षणी मनात उमटलेल्या भावना अशा काहीशा शब्दांत व्यक्त होतात. गडाविषयी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात वसलेला गोरखगड समुद्रसपाटीपासून सुमारे २१३७ फूट उंच आहे. पुण्यापासून अंदाजे १७० किमी अंतरावर असलेला हा गड देहरी या गावातून सुरू होतो. देहरी हे गाव मुरबाडपासून २५ किमी तर कर्जतपासून ५० किमी अंतरावर आहे. गोरखनाथ आश्रमाजवळून या ट्रेकची सुरुवात होते. मध्यम ते कठीण आणि काही ठिकाणी धोकादायक स्वरूपाचा हा ट्रेक प्रत्येक ट्रेकरच्या Bucket List मध्ये असायलाच हवा. सुरुवातीची वाट तुलनेने सोपी असली तरी पुढे ती अधिक...

#माझी_भ्रमंती_माझा_पहिला_हिमालयन_ट्रेक - भाग १

  पूर्वार्ध: तयारी, भारत - पाक तणाव आणि पुणे ते कसोल    एखादी आवडणारी गोष्ट पहिल्यांदा करायची असेल तेव्हा त्याबद्दल उत्सुकता आणि उत्कंठा असते. त्यासाठी करावी लागणारी तयारी करण्यात खूप मजा येते. तयारी पूर्ण केल्यानंतर कधी एकदा ती गोष्ट आपल्याकडून पूर्ण होतेय, ह्याची आस लागून राहते. म्हणूनच म्हणतात ना   *पहिलं ते पहिलं असतं, ज्यासाठी आपण स्वतःला पूर्णपणे वाहिलेलं असतं*   असच काहीतरी माझ्या बाबतीत झालं. हिमालयीन ट्रेक करायचा खूप वर्षापासून मनात होतं पण योग येत नव्हता. ह्यावर्षी तो आला. गेल्या नऊ वर्षापासून बऱ्यापैकी आपल्या सर्वांचा आवडता सह्याद्री तिन्ही ऋतूमध्ये फिरून झाला होता(आणि पुढेही चालूच राहणार). ज्यामध्ये मन अडकून होते. त्यातले गडकिल्ले, घाटवाटा, डोंगर रांगा फिरून झाल्या होत्या. त्यातच दर शनिवार - रविवारची सिंहगड वारी, दर महिन्याची कात्रज ते सिंहगड वारी मुळे हिमालयीन ट्रेक करू शकतो ह्याचा विश्वास होता. बऱ्याच जणांनी करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता. त्यामुळे ह्यावर्षी करायचे मनाने निश्चित केले. गुगल वर शोधाशोध केल्यावर मार्च मध्ये हिमाचल प्रदेशातील *पार्...

K2S Night Trek: कात्रज 2 सिंहगड ट्रेक.....एक अनुभूती....आणि एक अविस्मरणीय अनुभव...

Image
  Trek Date: 22-10-2016   K2S: कात्रज 2 सिंहगड ट्रेक ..... एक अनुभूती .... आणि एक अविस्मरणीय अनुभव ... 16 members...16 hills...9 hrs of thrilling journey.....and excitement. ---------------------------------------------------------------------------------------- K2S करायचा विचार केला आणि सर्वानी करायचं ठरवले . जेवढे मेंबर्स येतील त्यांना घेऊन करायचं . आमच्या ग्रुप मधील केतन पवार ह्या ध्येयवेडयाने ह्या अगोदर 3 वेळा हा ट्रेक केला होता म्हणून तोच लीड करणार असे ठरले . आणि यशस्वीपणे केतनने सर्वांना बरोबर घेऊन हा ट्रेक पूर्ण केला . Thank YoU केतन . दिवस ठरला 22 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजता निघायचं आणि रात्रभर चालून सकाळी 7 वाजेपर्यंत पोचायचं . त्याप्रमाणे रात्री 8 वाजता निघालो आणि 9 वाजता कात्रज tunnel च्या इथे पोचलो . 9.30 ला वाघजाई माता मंदिरात देवीचा दर्शन आणि शिवाजी महाराजांचा नाव घेऊन हर हर महादेव ... जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन ट्रेक ला सुरुवात केली . एक एक डोंगर चढून .. उतरून ...